Video : अर्नाळा समुद्रात मच्छीमारांना दिसला दुर्मिळ देव मासा
वसई- विरार : संदीप गायकवाड | विरामधील अर्नाळा समुद्र किनारी प्रकाश नावाची बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. या बोटीसमोर मच्छीमारांना दुर्मिळ जातीचा देव मासा आढळून आला. देव मासा दिसल्याने मच्छीमारांना देखील आनंद झाला. दुर्मिळ जातीचा देव माशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद खारखंडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत मासेमारीसाठी अर्नाळ्याच्या खोल समुद्रात गेले होते. त्याचवेळी त्यांच्या बोटीसमोर भुकेला देव मासा आला. या देव माशाला पाहून बोटीतील मच्छीमारांना दया आली. त्यांनी तातडीने बोटीमधील पकडलेले बोंबील, मांदेली व कोळंबी असे दोन कॅरेट असे मासे बोटवरील मच्छीमारांनी देव माशासमोर टाकले. या देव माशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बोट मालकाने दिलेल्या माहितीनुसार हा मासा थकलेल्या अवस्थेत होता. या आधी देखील भाईंदर उत्तानमधील एका बोटीच्या जाळ्यात देव मासा अडकला होता. त्यावेळी जाळे कापून त्या देव माशाला समुद्रात सोडण्यात आले होते.