व्हिडिओ
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबईत फुलांच्या दरात तिपटीने वाढ; जाणून घ्या दर
शारदीय नवरात्रीला सुरूवात होत आहे.
शारदीय नवरात्रीला सुरूवात होत आहे. नवरात्र उत्सवाला येत्या 3 तारखेपासून सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत फुलांच्या दरात तिपटीने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
20 ते 30 रुपयांनी विकला जाणारा पिवळा झेंडू 50 ते 60 रुपयांवर गेला असून नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस फुलांचे दर 20 ते 30 रुपयांनी किंवा त्याहून अधिक चढेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
यासोबतच लाल कलकत्ता झेंडू 80 रुपये किलो दराने विकला जात आहे तसेच पिवळा झेंडू 50 ते 60 रुपयांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे.