Free Education Scheme: मुलींना यंदापासून मोफत शिक्षण, 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना मिळणार लाभ

मुलींना यंदापासून मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाबाबत जीआर जारी करण्यात आलेला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मुलींना यंदापासून मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाबाबत जीआर जारी करण्यात आलेला आहे. 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे.

राज्यात मुलींना मोफत उच्च शिक्षण घेण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ज्या मुलींच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींना आता मोफत शिक्षण देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com