Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार; जाणून घ्या गोळीबाराचा संपूर्ण घटनाक्रम

अभिषेक घोसाळकर यांच्यावर जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं आहे. शवविच्छेदनानंतर घोसाळकरांचं पार्थिव त्यांच्या निवास्थानाकडं रवाना करण्यात आलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

अभिषेक घोसाळकर यांच्यावर जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं आहे. शवविच्छेदनानंतर घोसाळकरांचं पार्थिव त्यांच्या निवास्थानाकडं रवाना करण्यात आलं आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ठाकरे गटाचे दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बोरिवलीच्या आयसी कॉलनीत मॉरिस नरोन्हा याच्या ऑफिसमध्ये अभिषेक घोसाळकर गेले होते. त्या दोघांनी फेसबुक लाईव्ह केलं. फेसबुक लाईव्ह सुरु असताना मॉरिस तिथून उठून गेला. मॉरिस उठून गेल्यानंतर अभिषेक यांचं फेसबुक लाईव्ह सुरु होते. अभिषेक बोलणं संपवून उठत असताना त्यांच्यावर अचानक त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनंही स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com