Ganeshotsav 2024 | सागर खंडेलवाल यांच्या सजावटीने वेधलं लक्ष; 400 गणेश मूर्तीची केली सजावट

बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्यादरम्यान सर्वत्र आनंदमय वातावरण पाहायला मिळत आहे. बाप्पाचं आगमन हे प्रत्येकाकडे मोठ्या जल्लोषात झालेलं पाहायला मिळाल आहे.
Published by :
Team Lokshahi

बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्यादरम्यान सर्वत्र आनंदमय वातावरण पाहायला मिळत आहे. बाप्पाचं आगमन हे प्रत्येकाकडे मोठ्या जल्लोषात झालेलं पाहायला मिळाल आहे. अनेक ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळे आकर्षक अशी सजावट पाहायला मिळत आहे तसेच बाप्पा देखील आगळ्या वेगळ्या रुपात पाहायला मिळत आहे.

अशातच अमरावतीच्या सागर खंडेलवाल यांच्या घरातील गणपती बाप्पांनी अमरावतीकरांचे लक्ष वेधून घेतल आहे. खंडेलवाल कुटुंबाकडे 400 गणेश मूर्तीची सजावट करण्यात आलेली आहे. लहान मोठ्या गणरायांच्या मुर्त्यांनी देखील आकर्षक देखावा करण्यात आलेला आहे. आकर्षक गणरायांच्या मुर्त्यांनी खंडेलवालांचं घर सध्या सजलेलं आहे.

तसेच सजावटीसाठी ग्रामीण भागातील राहणीमान याठिकाणी देखाव्यासाठी साकार करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जीवन कसे असते ते या देखाव्यातून पाहायला मिळत आहे. या सजावटीची सुरुवात 11 गणपतीच्या मुर्तींपासून करण्यात आलेली होती जी आता 400 गणपतीच्या मुर्त्यांपर्यंत पोहचलेली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com