Aavaj Lokshahicha: भिवंडीत जागोजागी कचऱ्याचे ढीग, नागरिकांचं आरोग्य धोक्यात, प्रशासनाचं दुर्लक्ष

भिवंडी मनपा कचरा उचलणाऱ्या ठेकेदारावर महिन्याला पावणे दोन कोटी रुपये खर्च करत असतानाही शहरात कचरा समस्या गंभीर बनली आहे.
Published by :
Team Lokshahi

शहरात कचऱ्याची समस्या बिकट बनलेली आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असल्याने महापालिका प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये मनपा प्रशासन विरोधात प्रचंड संताप होत आहे. भिवंडी मनपा कचरा उचलणाऱ्या ठेकेदारावर महिन्याला पावणे दोन कोटी रुपये खर्च करत असतानाही शहरात कचरा समस्या गंभीर बनली आहे. शहरात दररोज साडेचारशे टन कचरा उचलला जात असून हा कचरा उचलण्यासाठी मनपा प्रशासने अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट् प्रा. लि. या कंपनीस प्रतिटन 1229 रुपये दर निश्चित करून सहा वर्षांसाठी कंत्राट दिले आहे. तरीही भिवंडी शहरांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य सासल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com