Lasalgaon onion market : कांदा कोंडी फोडण्यासाठी गिरीश महाजन लासलगाव मार्केटमध्ये दाखल

गिरीश महाजन यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी नाशिक दौरा केला आहे.
Published by  :
Team Lokshahi

नाशिक: गिरीश महाजन यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी नाशिक दौरा केलेला असून सरकार कोसळण्याच्या भीतीतून नाशिक दौरा केल्याची चर्चा सुरु झाली आहे. स्वतः गिरीश महाजन यांनी कांद्याचे भाव वाढवल्याने सरकार कोसळण्याची आठवण करून दिली आहे. शिवाय शेतकऱ्यांपेक्षा ग्राहक मतदारांची संख्या मोठी आहे असे सांगून त्यांना खरी चिंता ग्राकांची आहे असा प्रकार सूचित केला आहे. दुसरीकडे कांदा निर्यात शुल्क कमी होणार नसल्याच देखील गिरीश महाजन सांगण्यासाठी विसरले नाहीत. गिरीश महाजन यांच्या या भुमिकेमुळे शेतकऱ्यांना आता कोणीच वाली नाही अशी भावना आता बळावली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com