व्हिडिओ
तुमची लायकी, तुमची क्षमता; आबांच्या मुलाचा उल्लेख करत Gopichand Padalkar यांचा जयंत पाटलांवर निशाणा
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटलांवर निशाणा साधत अप्रत्यक्ष टीका केली. जयंत पाटीलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सांगली जिल्ह्यासाठी केलेल्या कामावर सवाल.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांसह अजित पवार आणि जयंत पाटलांवर निशाणा साधलाय. तुतारी आपलं पारंपारिक वाद्य आहे,पण एका माणसामुळे ती किती बदनाम होऊ शकतं,ते आपण बघितलं,अश्या मिश्कील शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली. तर अडीच वर्ष जयंत पाटील राज्याचे जलसंपदा मंत्री होते,पण सांगली जिल्ह्यासाठी त्यांनी काय केलं,असा सवाल करत जयंत पाटलांवर निशाणा साधला. दुसरीकडे आर आर पाटील यांचा मुलगा आमदार झाला याचं दुःखणे अधिक आणि आपला मुलगा आमदार झाला नाही,याचा टेन्शन आहे. असा अप्रत्यक्ष टोला आमदार पडळकर यांनी जयंत पाटलांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला आहे.