26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना अभिवादन!

26/11 दहशतवादी हल्ल्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून शहीद जवानांना अभिवादन करण्यात आलं आहे. 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 16 वर्ष पूर्ण झाली आहेत.
Published by :
Team Lokshahi

 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईसाठी तसेच संपूर्ण देशासाठी काळा दिवस ठरला होता. समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात त्या दिवसाच्या जखमा ओल्या आहेत. या घटनेला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली आहे. 

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com