व्हिडिओ
पालकमंत्री प्रकाश आबिटकरांच्या खंडपीठासाठी केलेलं मनधरणीनंतर उपोषण स्थगित
कोल्हापूरसह सहा जिह्यातील वकील आणि पक्षकारांनी खंडपीठाच्या मागणीसाठी सुरू केलेलं आमरण उपोषण पालकमंत्री प्रकाश आबिटकरांच्या आश्वासनानंतर स्थगित.
गेल्या 30 वर्षापासून कोल्हापूरसह सहा जिह्यातील वकील आणि पक्षकार मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूरात खंडपीठ व्हावे या मागणीसाठी लढा देत आहेत. मात्र अद्यापही या प्रश्नी सरकारने तोडगा काढलेला नाही. त्यामुळे खंडपीठ कृती समितीकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. ऐतिहासिक दसरा चौकात गेल्या नऊ दिवसांपासून हे आमरण उपोषण सुरू असून या उपोषणाला सोमवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट देऊन मुख्यमंत्र्याशी येत्या 15 तारखेला यासंदर्भात चर्चा करू अशी ग्वाही देऊन उपोषण सोडण्यासाठी पदवीधर मित्र संस्थेचे अध्यक्ष माणिक पाटील -चुयेकर यांना विनंती केली यानंतर नारळ पाणी आणि कलिंगड ज्यूस पिऊन माणिक पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केला.