Girgaon Gudhi Padwa 2025 : जल्लोष नवं वर्षाचा, मराठी अस्मितेचा, गिरगावात ढोल ताश्यांच्या गजरात नववर्षाचे स्वागत
आज गुढीपाडव्यानिमित्त आणि मराठी नववर्षानिमित्त गिरगांवमध्ये स्वागत यात्रेला सुरुवात झाली असून ढोल ताश्यांच्या गजरात मोठ्या दिमाख्यात यात्रेत तरुणाई, सोबत तरुण बायकार्स आपल्या वेगवेगळ्या बीके घेऊन या स्वागत यात्रेत सहभागी झालेत आणि कोळी बांधव देखील आपल्या अनोख्या देखाव्यात सहभागी झाले आहेत.
यावेळी गिरगांवमध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे अशातच लहान मुलांचा देखील तितकाच सहभाग पाहायला मिळतो आहे. सध्या गिरगाव मध्ये आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेमध्ये लहान तरुण सखे भाऊ बहीण या मिरवणुकीमध्ये पाहायला मिळत आहेत.
तसेच यात्रेसाठी अनेक महिला तरुणी सहभागी होत असतात. महिला आपल्या बाईक आणि बुलेट घेऊन येतात तसेच अशातच एक महिला आपल्या स्कूटरवर स्वार होऊन आईचा गर्भ पृथ्वीचे चित्ररथ तयार करून महिलांवर होत असलेल्या अत्याचारा संदर्भाचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे.