व्हिडिओ
Sambhajinagar : संभाजीनगरात गुजरात पोलीस! 250 कोटीचं ड्रग्ज जप्त; ड्रग्सचा मास्टरमाईंड कोण?
संभाजीनगरमध्ये गुजरात पोलीस आणि डीआरआयने मोठी कारवाई केली आहे. 3 ठिकाणी छापा टाकून तब्बल 250 कोटींचा ड्रग्जसाठा जप्त केला आहे.
संभाजीनगरमध्ये गुजरात पोलीस आणि डीआरआयने मोठी कारवाई केली आहे. 3 ठिकाणी छापा टाकून तब्बल 250 कोटींचा ड्रग्जसाठा जप्त केला आहे. अहमदाबाद DRI आणि अहमदाबाद पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हे छापे टाकण्यात आले आहेत. जालना रोडवर एक आरोपीच्या घरातून 23 किलो कोकेन, 3 किलो मेफेड्रोन आणि 30 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पैठण एमआयडीसीमध्ये महालक्ष्मी इंडस्ट्री या कारखान्यात छापा टाकून ड्रग्ज जप्त करण्यात आलंय.
