व्हिडिओ
Harbour Railway: हार्बर मार्गावरील लोकल विस्कळीत, वायर तुटल्याने लोकलवर परिणाम
हार्बर मार्गावरील लोकल विस्कळीत, पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पर्यंत वाहतूक खोळंबली, प्रवाशांना अडचणी.
लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. हार्बर मार्गावरील लोकल विस्कळीत झाली आहे. पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हार्बर लोकल खोळंबली आहे. छत्रपती शिवाजी महाराज कडून येणारी वाहतूक खोळंबली आहे.
पनवेल स्थानकाबाहेर काम सुरू असताना जेसीबीने वायर तोडल्याने हार्बर लाईनवर परिणाम झाला आहे. ज्यामुळे वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. मागील आर्ध्या तासापासून वाहतूक संथ गतीने सुरू आहे. तर लोकल 15 ते 20 मिनिट उशिरा धावते आहे ज्यामुळे प्रवाशी ट्रेक वरून चालत निघाले आहेत.