व्हिडिओ
Harbour Railway: ट्रान्स हार्बरवरील लोकलची वाहतूक विस्कळीत, वाहतूक सुरळीत करण्याचे रेल्वेचे प्रयत्न सुरु
हार्बरवरील लोकलची वाहतूक विस्कळीत झाली असून, तुर्भे-कोपरखैराने स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. हार्बरवरील लोकल उशिराने जात आहे. ठाण्यावरून तुर्भे किंवा कोपरखैराला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. ट्रान्स हार्बर ची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तुर्भे आणि कोपरखैराने स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या खोळंबल्या असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.