Pimpri-Chinchwad Fire : पिंपरी चिंचवडमध्ये हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग, चार जणांचा मृत्यू

पिंपरी चिंचवडमधील चिखली भागातील एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली.
Published by  :
Team Lokshahi

पिंपरी चिंचवडमधील चिखली भागातील एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहानग्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पहाटेच्या सुमारास चिखलीमधील सचिन हार्डवेअरला ही आग लागली होती. याच हार्डवेअरमध्ये कुटुंब वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही आग इतकी भीषण होती की, आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. यामध्ये दोन लहानग्यांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळं ही भीषण आग लागली असल्याचा अग्निशामक दलाचा प्राथमिक अंदाज आहे. पिंपरी चिंचवड अग्निशामक दलानं ही आग नियंत्रणात आणली असून, कुलिंगचे काम सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com