राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता

राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईच्या सीएसएमटी, कुलाबा,नरिमन पॉइंट ठिकाणी जोरदार पाऊस सध्या पडत आहे. पुढील ४८ तासात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा, अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पावसाने काही दिवस दांडी मारलेली असताना आता राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत.

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ठाणे आणि मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com