Pune Rain : पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात, ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू

पुणे शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पुणे शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. तर शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाने आता तुफान सुरुवात केली आहे. पावसाच्या आगमनामुळे आता पुणेकरांची आता उकाडापासून सुटका झाली आहे. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झालेला आहे. ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सरी बरसत असल्याचं पाहायला मिळतंय.

पुण्यात औंध, पाषाण, सकाळनगर, सूसरस्ता, सुतारवाडी, सूस म्हाळुंगे परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. तर वडगाव शेरी खराडी विमान नगर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे पुणेकर हैराण झाले होते. त्यांना सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com