kolkata Heavy Rainfall : कोलकात्यात पावसाचा कहर; 10 जणांचा मृत्यू

पावसामुळे जनजीवन विस्कळीत
Published by :
Team Lokshahi

थोडक्यात

  • कोलकात्यामध्ये जोरदार पाऊस

  • पावसामुळे जनजीवन विस्कळीत

  • शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर

(kolkata Heavy Rainfall) कोलकातामध्ये सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांपैकी 9 जणांचा बळी विजेच्या धक्क्याने गेला. सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

24 तासांच्या अवधीत तब्बल 251 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. 1986 नंतर प्रथमच एवढा मुसळधार पाऊस कोलकात्याने अनुभवला. रस्त्यावर पाणी साचल्याने ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली तर रेल्वे आणि मेट्रोसेवा खंडित झाल्या तर उड्डाणे देखील उशिरा सुरू होतीत.

राज्यातील शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी परिस्थितीला ‘भयानक’ म्हटले असून नागरिकांनी सुरक्षिततेसाठी घरातच थांबावे असे आवाहन केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com