Anand Dave : मोदींना जिरेटोप घालण्याची हिम्मतच कशी? आनंद दवेंचा प्रफुल्ल पटेल यांना सवाल

आनंद दवे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे.

आनंद दवे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे. मोदींना जिरेटोप घालण्याची पटेल यांची हिम्मतच कशी झाली असा सवाल विचारण्यात आला आहे. तर उद्या पंतप्रधान रायगडावर गेले तर सिंहासनावर बसवणार का? असा सवाल आनंद दवे यांनी विचारला आहे. वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रपुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घालून त्यांचं स्वागत केलं. यानंतर आता या प्रसंगी आता विविध राज्यातून टीका केली जात आहे. राज्यभरातील लोकं टीका करताना दिसून येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com