Jitendra Awhad: मला वाईट वाटतं, ज्या घरात...; चव्हाणांच्या राजीनाम्यावर आव्हाडांची प्रतिक्रिया

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे. आता अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला का दिला मला माहित नाही पण मला वाईट वाटतंय. ज्या घरात कॉंग्रेसने 1952 सालापासून मंत्रीपद दिलं, मंत्रीपद हे महत्त्वाचे नाही तर अशोक चव्हाणांचं घर हे कॉंग्रेसी विचाराचं होतं. शंकरराव चव्हाण हे कट्टर कॉंग्रेस होते आणि अशोक चव्हाणही कट्टर कॉंग्रेसी होते. असं काय झालं अचानक की त्यांना हे सोडावं लागतंय याच्यावर माझा काही विश्वास बसत नाही जे होतय ते दुर्देवी आहे. मुख्यमंत्री हेच असतील तर महाराष्ट्रचे गुन्हेगारीकरण होईल. हे खरे गंभीर आरोप आहेत. सत्ताधारी पक्षांमधील ही जी स्पर्धा आहे ती अजून धोकादायक आहे. निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला म्हणजे तुम्ही विर्दोहाचा आवाज जगू देणार आहात की नाही. त्या विर्दोहाचा आवाज तसाच दाबून टाकणार आहात. विर्दोहाचा आवाज जर जिवंत राहिला नाही तर तुम्ही कसं काम करणार असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com