Manoj Janrage Patil: "आरक्षण द्यायला जमत नसेल तर आता रस्त्यावर उतरू" जरांगेचा सरकारला थेट इशारा!

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे की आरक्षण द्यायला जमत नसेल तर आता मराठा आंदोलक रस्त्यावर उतरतील.
Published by :
Prachi Nate

सरकारला आरक्षण द्यायला जमत नसेल तर आता रस्त्यावर उतरणार असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. आज त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. त्याचबरोबर 22 फेब्रुवारी ते 22 मार्च दौरा करणार असून लोकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचंही जरांगे बोलले. तसेच आता यापुढे मुंबईमध्ये आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, 22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यत गाठी भेटी नियोजन करणार,राज्यातील प्रत्येक गावातील अडचण आम्हाला समजायला हवी. थेट छत्रपती भवनाला जोडणार, आम्हाला लोकांना जोडायच आहे.22मार्च पर्यत आम्हाला भेटण्यासाठी या... एक महिन्याच्या कालावधीत कधीही आम्हाला भेटण्यासाठी या... तुमच्या अडचणी सोडवू.... प्रत्येकाची अडचण छत्रपती भवनातून सोडवू.... आम्ही लोकांच्या कामात हातभार लावू...

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com