Lokshahi Impact : हिंगोलीत LOKशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट,कृषिमंत्र्याकडून शेतकऱ्याला बैलजोडी भेट

औताला भावाला व मुलाला जुंपणाऱ्या शेतकऱ्याला कृषीमंत्र्यांनी बैलजोडी भेट दिली आहे.

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील शिरली गावांमध्ये शेतात हळद लावण्यासाठी बैलजोडी नसल्याने आपल्या भावाला व मुलाला ओताला जुंपून शेतात हळद लागवड करणाऱ्या शेतकरी बालाजी पुडगे या शेतकऱ्यांची बातमी लोकशाही मराठीने दाखवताच, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या बातमीची दखल घेतली आहे. औताला भावाला व मुलाला जुंपणाऱ्या शेतकऱ्याला कृषीमंत्र्यांनी बैलजोडी भेट दिली आहे. धनंजय मुंडे यांनी शेतकरी बालाजी पुंडगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या घरी कृषी विभागाचे अधिकारी व कार्यकर्ते पाठवून त्यांना बैलजोडी भेट दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com