State Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खडाजंगी?

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
Published by :
Dhanshree Shintre

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खडाजंगी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढल्यामुळे ओबीसी मंत्र्यांमध्ये नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावरून सरकारमधील अनेक आमदार नाराज आहेत. मंत्री छगन भुजबळ गेल्या 2 दिवसांपासून ओबीसी नेत्यांच्या बैठका घेत आहेत. भुजबळ आज मंत्रिमंडळात या विषयावर चर्चा करण्याची शक्यता आहे. सगेसोयरेवरून मंत्रिमंडळात नाराजी नाट्य पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com