Imtiaz jaleel on Jarange Patil : जरांगेंच्या आंदोलनाकडे पाहून मला खंत वाटते की…

मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून उपोषणाचा तिढा अखेर सुटला आहे. यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नांदेड : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढला हा जरांगे पाटलांच्या लढाईचा विजय असून जरांगेंना धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते. आपण आमदार होतो तेव्हापासून आपली मराठा आरक्षणाची मागणी होती, असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. सोबतच मुस्लीम समाजात कोणी जरांगे होत असेल तर आपण त्याचा पाठिशी असेल, असं खासदार इम्तियाज जलील म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com