BJP MLA : बीजेपी आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणी महेश गायकवाडचा मुकमोर्चा

कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारानंतर महेश गायकवाडचा डीसीपी कार्यालयावर मुकमोर्चा
Published by :
Team Lokshahi

ठाण्याच्या उल्हासनगरमध्ये हिललाईन पोलिस स्टेशनच्या आवारात १४ फ्रेब्रुवारी २०२४ रोजी, कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून भर पोलीस स्टेशनमध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. याच पार्श्वभूमीवर महेश गायकवाड यांनी डीसीपी कार्यालयावरती मुकमोर्चा काढला आहे याच पार्श्वभूमीवर महेश गायकवाड यांनी माध्यांमाना प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महेश गायकवाड यांची प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख

"सामान्य व्यक्तीने गुन्हा केला तर यांच्यावर लगेच कारवाई केली जाते... संपत गायकवाड फरार आरोपी असूनही, त्यांची संपत्ती जप्त केली नाही... फरार आरोपी बीजेपीचा युवा मोर्चा अध्यक्ष आहे... पोलिस कायदा राजकीय दबाव चालला आहे ..याचं हे कल्याण शहर एक उत्तम उदाहरण राहिल... न्यायासाठी आम्ही मुख्यमंत्र्याच्या दालनात जाणार आहोत. महेश गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com