Washim : वाशिममध्ये एसटी प्रवाशांच्या जीवाशी खेळ, मद्यधुंद अवस्थेत चालक एसटी चालवत असल्याचं उघड

पुसदहून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाशिममध्ये एसटी प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्यात आलेला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पुसदहून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाशिममध्ये एसटी प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्यात आलेला आहे. मद्यधुंद अवस्थेत चालक एसटी चालवत असल्याचं उघड झालेलं आहे. पुसदहून ही एसटी जळगावकडे निघाली होती आणि त्यावेळी एसटी बसमध्ये प्रवाशांच्या जीवाशी हा खेळ सुरु होता. चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचं कळताच प्रवाशांनी बस रस्त्याच्या कडेला लावली आहे आणि भर उन्हात ५० प्रवाशांना रस्त्यात थांबण्याची वेळ आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बस चालकाला ताब्यात घेतले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com