Plane Fare Hike: विमान फेऱ्याऱ्यांमध्ये घट झाल्याने तिकीट दरात वाढ

विमान तिकिटातील वाढ ही मुंबई ते दिल्ली, बंगळुरू, श्रीनगर या मार्गावर नोंदली गेली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

विस्तारा कंपनीच्या वैमानिकांच्या सुट्टयांचा परिणाम विस्तारा कंपनीच्या विमान फेऱ्या कमी होण्यात झाल्यानंतर आता ऐन उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात देशांतर्गत विमान प्रवासाच्या किमती 20 ते 25 टक्क्यांनी महागल्याचे दिसून आले आहे. विमान तिकिटातील वाढ ही मुंबई ते दिल्ली, बंगळुरू, श्रीनगर या मार्गावर नोंदली गेली आहे.

देशांतर्गत पर्यटनस्थळांच्या विमान प्रवास दरातही किमान 12 ते कमाल 25 टक्के वाढ नोंदली गेली आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात इंजिनातील बिघाड आणि कंपनीची आर्थिक स्थिती खालावल्याने गो-फर्स्ट कंपनीची 56 विमाने जमिनीवर स्थिरावली. देशांतर्गत विमान सेवेतील 56 विमाने एकाचवेळी कमी झाल्यामुळे अन्य विमान कंपन्यांवर वाढत्या प्रवासी संख्येचा ताण आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com