व्हिडिओ
India's GDP Growth Slowing Down: भारताचा जीडीपी अवघा 6.7 टक्क्यांवर
भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण पाहायला मिळत आहे. भारताचा जीडीपी अवघा 6.7 टक्क्यांवर आलेला आहे. गेल्या पाच तिमाहींमधील ही सर्वात कमी दरवाढ आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण पाहायला मिळत आहे. भारताचा जीडीपी अवघा 6.7 टक्क्यांवर आलेला आहे. गेल्या पाच तिमाहींमधील ही सर्वात कमी दरवाढ आहे. देशातील कृषीक्षेत्राला मोठा फटका बसलेला आहे. तर भारताच्या जीडीपीमध्ये सातत्याने घसरण होताना दिसत आहे. तर एप्रिल ते जून 2024 या तिमाहीतला जीडीपीचा दर 6.7 टक्के इतका घसरलेला आहे.
गेल्यावर्षी याच तिमाहींमध्ये भारताचा जीडीपी दर हा 8.2 टक्के इतका होता मात्र आता तो घसरून 6.7 इतका झाला आहे. तर शासकीय आकडेवारीनुसार देशाचा जीडीपी घसरण्याचं कारण म्हणजे कृषीक्षेत्राची खराब कामगिरी आहे. कृषी उत्पादक एवढ कमी झालं आहे की त्याचा थेट परिणाम जीडीपीवर झाला आहे.