Uday Samant : मोठी बातमी! उद्योगमंत्री उदय सामंत मुंबईतील लिलावती हॅास्पिटलमध्ये दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील महत्त्वाचे मंत्री असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Published by :
Team Lokshahi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील महत्त्वाचे मंत्री असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंत्री उदय सामंत यांना उच्च रक्त दाबाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना मुंबईतील लिलावती हॅास्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच बरे होतील असे डॅाक्टरांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com