व्हिडिओ
Pune Metro: पुणे मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग कोसळला! चारचाकी गाडीचं मोठं नुकसान
पुण्यात येरवडा इथे काम सुरू असलेल्या मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग स्टेशन खालून जाणाऱ्या एका चारचाकीवर कोसळला.
पुण्यात मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग कोसळला. येरवडा भागात काल रात्री ८ वाजता घटना घडली . येरवडा इथे काम सुरू असलेल्या मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग स्टेशन खालून जाणाऱ्या एका चारचाकीवर कोसळला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र चारचाकी वाहनाचं मोठं नुकसान झालं. महा मेट्रोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी घडलेल्या घटनेबाबत दुजोरा दिला असून नेमकी ही घटना कशामुळे घडली याची चौकशी सुरू आहे.