Mufti Salman Azhari : इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अजहरींना गुजरात एटीएसकडून अटक

मुफ्ती सलमान ला गुजरात पोलिसांनी घाटकोपर येथून ताब्यात घेतले. गुजरातमध्ये जुनागड येथे कार्यक्रमादरम्यान मुफ्ती याने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
Published by :
Dhanshree Shintre

मुफ्ती सलमान ला गुजरात पोलिसांनी घाटकोपर येथून ताब्यात घेतले. गुजरातमध्ये जुनागड येथे कार्यक्रमादरम्यान मुफ्ती याने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर जुनागड पोलिसांनी मुफ्ती सलमान आणि इतर दोन आयोजकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर गुजरात पोलिसांनी दोन आयोजकांना अटक केलं होतं मात्र मुफ्ती सलमान हा फरार होता. त्यानंतर गुजरात पोलिसांना सलमान हा मुंबईमध्ये असल्याचा समजताच गुजरात एटीएस आणि मुंबई एटीएस यांच्या मदतीने सलमानला अटक करण्यात आले आहे. मुफ्ती सलमान अजहरी याला घाटकोपर परिसरातून अटक करण्यात आले असून सध्या आरोपीला गुजरातला नेण्याकरता प्रक्रिया ही मुंबई पोलीस आणि गुजरात पोलीस यांच्यामध्ये सुरू आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com