Rajan Salvi : 'पत्नीवर, मुलावर गुन्हा दाखल झाला ही दुर्दैवाची बाब', राजन साळवींचा एसीबीवर आरोप

एसीबीने चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे, माझ्या पत्नी, मुलावर गुन्हा दाखल झाला ही दुर्दैवाची बाब असल्याची प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी दिली आहे.
Published by :
Team Lokshahi

ज्या पद्धतीने माझ्या पत्नीवर, मुलावर गुन्हा दाखल झाला ही दुर्दैवाची बाब आहे. काल आम्हाला मुंबई उच्च न्यायालयात दिलासा मिळाला. आमचा न्यायदेवतेवर विश्वास होता, आहे आणि राहील. आम्ही निर्दोष आहोत हे आम्हाला आणि जनतेलाही माहीत आहे. जनतेच्या आशीर्वादामुळेच आम्ही पुढे जात आहोत. एसीबीने चुकीच्या पद्धतीने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. एसीबीवर काय अॅक्शन घेता येईल यासाठी आम्ही कायदेतज्ज्ञाची मदत घेणार आहोत असं आमदार राजन साळवी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com