Team India: टीम इंडियाला मायदेशी परतण्यासाठी लागणार 12 तास; पावसामुळे बार्बाडोस विमानतळ बंद

T20 वर्ल्डकपच्या विजयासाठी भारतीयांना आता प्रतिक्षा करावी लागणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

T20 वर्ल्डकपच्या विजयासाठी भारतीयांना आता प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण आपली इंडियन टीम बार्बाडोसमध्ये अडकली आहे. त्या ठिकाणी चक्रीवादळ पाहायला मिळत आहे. वारा वाहतोय आणि उड्डाण रद्द आहेत.

त्यामुळे बार्बाडोसमध्ये अडकलेल्या टीम इंडियाला मायदेशी परतण्यासाठी 6 ते 12 तास लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. बार्बाडोस विमानतळ उघडण्यासाठी 6 ते 12 तास लागणार असल्याची शक्यता आहे. हादळ आणि वाऱ्यामुळे बार्बाडोस विमानतळ बंद आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com