व्हिडिओ
video: इम्तियाज जलील यांच्यासमोर दिल्या जय श्रीरामच्या घोषणा अन् भर कार्यक्रमातून...
अमृत भारत रेल्वे योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यक्रमात, खासदार इम्तियाज जलील यांच्यासमोर दिल्या जय श्रीरामच्या घोषणा
छत्रपती संभाजीनगर: अमृत भारत रेल्वे योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यक्रमात, खासदार इम्तियाज जलील(Imtiyaz Jaleel) उपस्थित होते. परंतु, यावेळी यांच्यासमोर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील भर कार्यक्रमातून निघून गेले.
यावर खुलासा करताना खासदार जलील म्हणाले, माझ एक दौलताबादला उद्घाटन होते, त्यामुळे मी निघालो. मी भाषणात मोदींचे अभिनंदन केले आहे. आठ वर्षांनी का होईना, छत्रपती संभाजीनगरला नवीन बिल्डिंग मिळत आहे. परंतु, यासोबतच रेल्वे कनेक्टिव्हिटी देखील पाहिजे, नुसती इमारत बांधून काही होणार नाही. मला कशाला विरोध होऊ शकतो, मी जय श्रीरामच्या नाऱ्याला विरोध का करु, माझ्याकडे एकच ड्रेस राहिला आहे. म्हणून मी काळा ड्रेस घालून आलो आहे. सगळे रंग माझेच आहेत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.