व्हिडिओ
Jalgaon : शालेय पोषण आहारात केळी, अंडीचा समावेश
शालेय पोषण आहारात केळीचा समावेश करावा ही मागणी केल्या अनेक वर्षापासून केळी उत्पादक शेतकऱ्यांची होती.
शालेय पोषण आहारात केळीचा समावेश करावा ही मागणी केल्या अनेक वर्षापासून केळी उत्पादक शेतकऱ्यांची होती. दरम्यान प्रधानमंत्री शक्ती पोषण योजनेच्या माध्यमातून नाविन्यता पोषक आहार अंतर्गत शालेय पोषण आहारात केळी व अंडी चा समावेश करण्यात आला आहे.
शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी केळी तर मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी अंडी पोषण आहाराच्या माध्यमातून देण्यात येणार असून शालेय पोषण आहारात केळीचा समावेश झाल्याने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मात्र याचा मोठा फायदा होणार आहे . तर ज्या भागात केळी उपलब्ध नसणार त्या ठिकाणी स्थानिक फळ पोषण आहारात समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे.