Jalna Loksabha : जालना लोकसभेची जागा काँग्रेसकडून ठाकरे गटाकडे? शिवाजीराव चोथे यांचे नाव आघाडीवर

जालना लोकसभेची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता असून गेल्या 5 दिवसात झालेल्या वेगवेगळ्या बैठकामध्ये शिवसेनेने या जागेचा आग्रह धरला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

जालना लोकसभेची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता असून गेल्या 5 दिवसात झालेल्या वेगवेगळ्या बैठकामध्ये शिवसेनेने या जागेचा आग्रह धरला आहे. या जागेवर ठाकरे गटाकडुन माजी आमदार शिवाजीराव चोथे यांच नाव समोर येते आहे. त्यामुळे कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक अशी ओळख असलेल्या चोथेंचा भाजपच्या रावसाहेब दानवे यांच्याशी सामना पाहायला मिळू शकतो. परंपरेने महविकास आघाडीत काँग्रेसकडे असलेल्या या जागेवर गेली 7 टर्म काँग्रेसला पराभव पाहावा लागला आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडे ही जागा दिल्यास, भाजपचा पराभव अटळ असल्याची प्रतिक्रिया शिवाजीराव चोथे यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com