तुषार दोशींच्या बदलीवरुन जरांगे सरकारवर नाराज

जालन्याचे एसपी तुषार दोशींच्या सीआयडीमध्ये केलेल्या बदलीवरुन मनोज जरांगे पाटील सरकारवर नाराज झाले आहेत.
Published by  :
Team Lokshahi

जालन्याचे एसपी तुषार दोशींच्या सीआयडीमध्ये केलेल्या बदलीवरुन मनोज जरांगे पाटील सरकारवर नाराज झाले आहेत. निष्पाप मराठा समाजावर लाठ्या चालवणाऱ्या तुषार दोशींना बढतीचं बक्षीस दिल्याची टीका मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. तुषार दोशींनी लाठीचार्जच्या दिलेल्या आदेशांची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी मराठा समाजाची होती. ही मागणी धुडकावून सुट्टीवर पाठवलेल्या तुषार दोशींना सीआयडीत एसपी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com