Jarange Patil On Narhari Zirwa l नरहरी झिरवाळांचं बेमुदत आंदोलन; पहा काय म्हणाले जरांगे पाटील ?

नरहरी झिरवाळांचं बेमुदत आंदोलन सुरु झालेलं आहे. धनगरांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करु नये अशी त्यांची मागणी आहे
Published by :
Team Lokshahi

नरहरी झिरवाळांचं बेमुदत आंदोलन सुरु झालेलं आहे. धनगरांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करु नये अशी त्यांची मागणी आहे आणि ते धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा विरोध करत आहेत. त्यासाठी त्यांनी बेमुदत आंदोलन सुरु केलं आहे.

आंदोलन ठिकाणावरून आदिवासी आमदारांचे विशिष्ट मंडळ मंत्रालयात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यासाठी नरहरी झिरवाळ हे आग्रहरी आहे. निवडणूकीच्या तोंडावर सरकारकडून धनगर समाजाला खुश करण्यासाठी निर्णय घेतला जाणार असल्याची आदिवासी समाजाला भिती सतावते आहे आणि त्यासाठी नरहरी झिरवाळ हे आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलनाला बसलेले आहेत.

यापार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, त्यांना वाटत असेल की ते आमच्या ताटात जेवत आहेत. त्यांना असं वाटत असेल हे आमच्या ताटातलं खायला लागले आहेत, आमच्या ताटात येत आहेत, आमच्या ताटातलं ओढून घ्यायला लागले आहेत त्यामुळे आम्हालाच खायला काही नाही. प्रत्येकाला अधिकार आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com