Manoj Jarange : उपोषणाला परवानगी नाकारताच जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून राज्याच्या राजकारणात मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
Published by :
Dhanshree Shintre

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून राज्याच्या राजकारणात मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मराठा आंदोलक मनोड जरांगे उपोषणाला ठाम आहेत. पोलिसांनी मनोज जरांगेच्या उपोषणाला परवानगी नाकारली आहे. मी कायदा मानतो, घटनेनं मला अधिकार दिला आहे असं जरांगे म्हणतात. स्थगित केलेल्या आंदोलनाला परवानगीची गरज नाही असंही जरांगेंचं म्हणणं आहे.

मी कायदा मानतो, घटना मानतो. मला घटनेनं अधिकार दिला आहे. परवानगीला नाही अधिकार दिला. 4 तारखेला आचारसंहिता होती त्या आचारसंहितेचा सामना केलेला आहे. मी 8 तारखेला उपोषण पुढे ढकललं आहे. पुन्हा पुन्हा तुम्ही नाकारणार असाल तर मी तुम्ही नाकारलेल्या परवानगीला मानत नाही मी कायद्याला मानतो, कायद्याने मला अधिकार दिलेला आहे. मी उद्या 8 जूनला सकाळी 10 वाजता आमरण उपोषणाला बसणार आहे, मी हारणार नाही असे मनोज जरांगे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com