Manoj Jarange Patil : भुजबळांचे नाव घेत जरांगेंचा शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप

आरक्षणाचा लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी आता सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Published by  :
Team Lokshahi

आरक्षणाचा लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी आता सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकारला महाराष्ट्रात जातीय दंगली भडकवायच्या आहेत का असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी केला आहे. मराठा समाजाच्या रात्री अपरात्री होणाऱ्या सभांमुळं आयोजकांवर गुन्हे दाखल होत आहेत. यावरुन जरांगे पाटलांनी संताप व्यक्त केला आहे.

सरकारच्या मनात नक्की काय आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे तिघं भुजबळांना पुढं करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा सवाल मनोज जरांगेंनी उपस्थित केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com