Jay Pawar Engagement Ceremony : जय पवारांचा साखरपुडा संपन्न, शरद पवार आले अन् अजित पवारांच्या 'त्या' कृतीने वेधले सर्वांचे लक्ष

साखपुडा सोहळा: अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा संपन्न, शरद पवार उपस्थित
Published by :
Prachi Nate

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा पुण्यात साखरपुडा पार पडला आहे. पुण्यातील अजित पवारांच्या फार्महाऊसवर या साखरपुडा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्तानं अवघं पवार कुटुंब एकत्र पाहायला मिळालं आहे. जय पवार यांच्या साखरपुड्यातील सोहळ्याचे सुप्रिया सुळे यांनी कुटुंबासोबतचे काही खास फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे.

काल सायंकाळी जय पवार यांचा ऋतुजा पाटील यांच्याशी साखरपुडा विधी संपन्न झाला. यादरम्यान शरद पवारांनी आपल्या नातवाच्या साखरपुड्याला हजेरी लावलेली होती. त्यावेळी शरद पवारांना आणायला चक्क अजित पवार गेटपर्यंत गेले होते. अजित पवार, पार्थ पवार यांनी शरद पवारांचं स्वागत केलं. अजित पवारांच्या या कृतीने अवघ्या राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. शरद पवारांच्या एन्ट्रीचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com