व्हिडिओ
Jitendra Awhad- Eknath Shinde Meeting: मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकं काय झालं? आव्हाड काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमध्ये नेमकं काय झालं? आव्हाड यांनी माध्यमांसमोर सांगितले की ही भेट राजकीय नव्हती, पण महाराष्ट्रात चर्चा का सुरू झाली आहे?
जितेंद्र आव्हाड यांनी आता एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याच समोर आलं आहे. वर्षा बंगल्यावर जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ही भेट का झाली होती जिंतेद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आमची भेट राजकीय नव्हती भेटी नंतर जितेंद्र आव्हाड यांनी असं माध्यमांसमोर सांगितलं आहे.
तर पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तर्कवितर्क हा राजकारणात राहिलाच पाहिजे, संशय हा राजकारणात राहिलाच पाहिजे. तरचं एका राजकारण्याचं महत्त्व वाढेल आज जर तुम्ही तर्कवितर्क केले तरच महाराष्ट्रात तुमची चर्चा चालेल. जर सगळ मी तुम्हाला उघडपणे सांगितल तर महाराष्ट्रात चर्चा कशी सुरु होईल मग? असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. तर आता ही भेट होण्यामागे नेमक काय कारण होत याकडे आता लक्ष लागलेलं आहे.