व्हिडिओ
जरांगे पाटलांच्या सभेला शिवसेनेचा पाठिंबा?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या कल्याणमध्ये जरांगे पाटलांची सभा होते आहे. या सभेसाठी कल्याणमध्ये येणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या स्वागताचे बॅनर शिवसेनेनं लावले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या कल्याणमध्ये जरांगे पाटलांची सभा होते आहे. या सभेसाठी कल्याणमध्ये येणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या स्वागताचे बॅनर शिवसेनेनं लावले आहेत. कल्याणमध्ये एकनाथ शिंदेंचे सूपुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. तर मनोज जरांगेंच्या सभांमुळं राजकीय फटका बसण्याची भीती अनेक राजकीय नेत्यांना आहे. त्यामुळं जरांगेंच्या ज्या ठिकाणी सभा होतात तिथले लोकप्रतिनिधी गॅसवर असल्याचं पाहायला मिळतं आहे.
कल्याणमध्ये मात्र उलटच घडलं आहे. शिवसेनेनं जरांगेंच्या स्वागताचे ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. शिवसेनेच्या या बॅनरबाजीमुळं कल्याणमध्ये वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे.