Crossfire With Karuna Munde: "आका वाल्मीक, वाल्मीकचा आका धनंजय मुंडे"- करुणा मुंडे
करुणा मुंडे यांनी आज लोकशाही मराठीला भेट दिली होती आणि त्या दरम्यान त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. बीडमध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुरेश धस यांनी आका आणि आकाचा आका असे उल्लेख केले होते. त्यावर आता करुणा मुंडेंनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.
करुणा मुंडे म्हणाल्या की, आका म्हणजे वाल्मिक कराड आणि "बाप तो बाप रहेगा" आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे, ज्यांच्या सांगण्यावर हे सगळ सुरु आहे... कोट्यवधी रुपये हे सभा आणि अभिनेत्रींवर खर्च करतात, कुठुन येत हे... हे आका लोकं तर त्यांना जमवून देतात... आणि हे आका फक्त एकचं नाही आहेत, पुण्याचा आका वेगळा आहे, सांगलीचा आका वेगळा आहे, हे सगळे भु-माफिया आहेत...
तसेचं पुढे करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडेंची सवय आहे ते स्वतः नाही बोलतं, त्यांनी बोलायला पण लोकं ठेवलेली आहेत... तुम्ही काल पाहिलं असेल की, सदावर्तेंनी माझ्यावर प्रतिक्रिया दिली होती... ते माझ्या माणसांना बोलले की, मी लोकांसोबत बोलायचे पण पैसे घेतो... म्हणजे, समजून जा की धनंजय मुंडेंसाठी किती पैसे घेतले असतील.. ते माझे किंवा माझ्या पतीचे कोणाचे ही वकील नाही, मगं ते आमच्या दोघांमध्ये का बोलत आहेत...