Kolhapur Ambabai Lighting :आई अंबाबाईच्या स्वागताला रांगोळ्यांच्या पायघड्या

श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी मार्गाच्या दुतर्फा उभे असलेले भाविक, उत्सवमूर्तीवर होणारा फुलांचा वर्षाव अशा प्रसन्न वातावरणात अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा सोहळा संपन्न झाला.
Published by :
Team Lokshahi

श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी मार्गाच्या दुतर्फा उभे असलेले भाविक, उत्सवमूर्तीवर होणारा फुलांचा वर्षाव अशा प्रसन्न वातावरणात अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा सोहळा संपन्न झाला. नवरात्रात अष्टमीला नगरवासीयांची भेट घेण्यास निघणाऱ्या देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ‘अंबा माता की जय...' अशा अंबा मातेच्या जयघोषाने प्रफुल्लित परिसर, रांगोळीचे गालीचे, फुलांच्या पायघड्या, पारंपरिक वाद्यवृंद, भालदार, चोपदार, रोषणाई असा शाही लवाजमा घेऊन फुलांनी सजवलेल्या वाहनातून करवीर निवासिनी अंबाबाई शहरवासीयांच्या भेटीला मंदिराबाहेर पडली. संपूर्ण मार्ग जगदंबेच्या स्वागतासाठी रांगोळी आणि फुलांनी सजला होता. फुलांनी सजविलेल्या वाहनात रात्री साडेनऊला देवीची उत्सवमूर्ती विराजमान झाली. मान्यवरांच्या हस्ते वाहन पूजन झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com