Kolhapur : कोल्हापूर महापालिका अ‍ॅक्शन मोडवर

कोल्हापूर परिसरातील लक्षतीर्थ वसाहत इथं अनधिकृत मदरसा आणि प्रार्थना स्थळावर महापालिकेची कारवाई करण्याची मागणी आहे.
Published by :
Team Lokshahi

कोल्हापूर परिसरातील लक्षतीर्थ वसाहत इथं अनधिकृत मदरसा आणि प्रार्थना स्थळावर महापालिकेची कारवाई करण्याची मागणी आहे. कोल्हापूर महापालिका अॅक्शन मोडवर आलेली आहे. लक्षतीर्थ वसाहत इथं अनधिकृत मदरसा, प्रार्थना स्थळ उभारल्याचा महापालिकेला संशय आहे. प्रचंड पोलीस बंदोबस्तात मदरसा आणि प्रार्थना स्थळांचा पंचनामा सुरू आहे. महापालिका अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पंचनामा करून मदरसा आणि प्रार्थना स्थळांना टाळे ठोकले आहेत. मोठा बंदोबस्त लावल्याने लक्षतीर्थ वसाहतीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com