Kolhapur Rain : कोल्हापुरात पावसाचा जोर, नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या २४ तासात ८ फुटांनी वाढ झाली आहे.
Published by :
shweta walge

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे गेल्या २४ तासात जिल्हयातील सर्वच धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे, यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे तसेच नदीपात्रातील पाणीपातळी ही वाढली आहे. पंचगंगा नदीच्या (Panchganga river) पाणी पातळीत गेल्या २४ तासात ८ फुटांनी वाढ झाली आहे. दिनांक - ८ जुलै २०२२ पर्यंत जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये आपण आपल्या अधीनस्त सर्व विभाग आणि यंत्रणा सतर्क ठेवाव्यात. आपला अधिकारी आणि कर्मचारी वर्ग त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणीच राहील याची खबरदारी घ्यावी, संदेश देवाण घेवाण यंत्रणा व्यत्यय रहित सुरु राहील याची खात्री करावी, जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क ठेवावा अस आवाहन करण्यात आलं आहे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com