व्हिडिओ
Kolhapur : भोगावती कारखान्याची मतमोजणी ठप्प
कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी ठप्प झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी ठप्प झाली आहे. महसूल यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असून त्या ठिकाणी मतपत्रिकेत खाडाखोड करत असल्याचा आरोप केला आहे. पॅनलच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना घेरावच घातला आहे.
सध्या या मतमोजणी केंद्रावर प्रचंड गोंधळ पाहायला मिळत असून मतदार प्रतिनिधींनी सध्या मतमोजणी प्रक्रिया बंद पाडली आहे. आक्षेप घेणारे पोलिसांसमोरच मतमोजणी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत आहेत.