व्हिडिओ
Nanded | Haldiram | नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?, हल्दीरामच्या शेवमध्ये आढळल्या अळ्या
नांदेडमध्ये हल्दीरामच्या शेवमध्ये अळ्या आढळल्या, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
नांदेड शहरातील डी-मार्टमध्ये खरेदी केलेल्या हल्दीरामच्या भुजिया सेवमध्ये अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्राहक धनंजय सूर्यवंशी यांनी डी-मार्टमधून काही सामान खरेदी केले होते. त्यात हल्दीरामच्या भुजिया सेवमध्ये अळ्या आढळल्या. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा डी-मार्टमध्ये जाऊन चौकशी केली, तेव्हा दुसऱ्या पॉकेटमध्येही अळ्या आढळून आल्या. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी धनंजय सूर्यवंशी यांनी केली आहे.