Shantigiri Maharaj: नाशिक लोकसभेतून माघारीचा अखेरचा दिवस, शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम

नशिक लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे.
Published by :
Sakshi Patil

नाशिक लोकसभेतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. यातच शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर शांतीगिरी महाराज माध्यमांशी बोलताना म्हणाले की, निर्णय झालेला आहे की लढायचं आणि जिंकायचं त्यामुळे माघारी घ्यायचा प्रश्नच संपलेला आहे. उद्या आमची एक बैठक होणार आहे त्यात आमचं चित्र संपष्ट होणार आहे, असं शांतीगिरी महाराज म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com